Black hole by Anand ghaisas
अरूपाचे रूप... (आनंद घैसास) कृष्णविवराचं छायाचित्र घेण्यात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साह्यानं शास्त्रज्ञांना नुकतंच यश मिळालं आहे. प्रत्यक्षात डोळ्यांना न दिसणाऱ्या कृष्णविवराचं हे छायाचित्र आहे. जगभरातल्या खगोलशास्त्रात संशोधन करणाऱ्या निरनिराळ्या संस्थांमधल्या सुमारे दोनशे शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांचं हे फलित आहे. हे छायाचित्र नक्की काय सांगतं, त्याचं महत्त्व काय, ते नक्की कसं काढलं गेलं, त्यात कोणत्या अडचणी आल्या, कोणतं तंत्रज्ञान वापरलं गेलं आदी सगळ्या गोष्टींबाबत ऊहापोह. "जेन देखे रवी, ते देखे कवी' असं म्हटलं जातं. म्हणजे जे कधी कोणाला दिसणार नाही, अस्तित्त्वातच नाही, ते फक्त कवीच स्वत:च्या कल्पनेने पाहू शकतात... पण आता हे वचन बदलावं लागणार असं दिसतं. कारण जे प्रत्यक्षात दिसत नाही अशा कृष्णविवराचं छायाचित्र घेण्यात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साह्यानं शास्त्रज्ञांना नुकतंच यश मिळालं आहे. हे काम कोण्या एकट्याचं नाही, तर जगभरातल्या खगोलशास्त्रात संशोधन करणाऱ्या निरनिराळ्या संस्थांमधल्या सुमारे दोनशे...
Comments
Post a Comment